या दिवशी जाहीर होणार 10 वी 12 वी चा निकाल | 10th and 12th Result | Varsha Gaikwad | Maharashtra News

2021-09-13 153

मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात कोरोनामुळे देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, राज्यातील शैक्षणिक क्षेत्रावरही याचा परिणाम झाला. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला असून अंतिम वर्षांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालावर या कोरोना महामारीच्या लॉकडाउनचा परिणाम झाला आहे. त्यामुळे, यंदा दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल उशीरा लागणार असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच, जुलै महिन्यापासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यास मान्यता दिली.त्यामुळे, शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्यापही दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये नवीन प्रवेशासाठी संभ्रम आहे. मात्र, जुलै महिन्यात निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. ‘जुलै महिन्यात या दोन्ही परीक्षांचे निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे’,असं त्या म्हणाल्या आहेत. एबीपी माझावर एका कार्यक्रमात बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
#lokmat #varshagaikawad #maharashtranews #10thresult
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires